आदिवासी तरुणांमध्ये जाणीवजागृती करणारा आगळावेगळा शैक्षणिक प्रयोग
आदिवासी तरुणांनी ग्रामसभेला वन कार्ययोजना बनवण्यासाठी मदत करावी, या हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. प्रत्यक्ष वन कार्ययोजना तयार करताना या तरुणांनी या अभ्यासक्रमाद्वारे मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग केला आहेच. त्या दृष्टीने हा अभ्यासक्रम यशस्वी झाला यात शंका नाही. पण त्यासोबत लेखातली दोन उदाहरणे हा त्यांच्यात झालेल्या जाणीवजागृतीचा भक्कम पुरावा आहे. आम्ही त्यालाच अभ्यासक्रमाचे खरे यश समजतो.......